महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद व पंचायत समिती
महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम 1961 चे कलम 142 (2) अन्वये दिनांक 01 मे 1962 रोजी पंचायत समिती, चिखलदरा ची स्थापना करण्यात आली. चिखलदरा पंचायत समितीचे बहुतांश क्षेत्र आदिवासी व अतिदुर्गम असुन पंचायत समितीचे एकुण भौगोलिक क्षेत्रफळ 250800 हे आहे. या पैकी, 19407643 हेक्टर क्षेत्र जंगल व्याप्त असून 27948.12 हेक्टर हे लागवड योग्य आहे.
पंचायत समिती, कार्यालयाची रचना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधिल तरतुदी नुसार शासन व्दारे करण्यात आली आहे.
कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल महा जि.प. व पं.स. अधिनियम, १९६१ अन्वये निर्धारित केल्यानुसार पार पाडण्यात येतात.
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबइ
कार्यक्षेत्र: भौगोलिक चिखलदरा तालुका कार्यानुरुप सर्व ग्रामिण भाग
विशिष्ट कार्य : शासकीय योजनांची अंमलबजावणी व पर्यवेकरणे.
विभागाचे ध्येय धोरण-शासनाची विविध योजनांची ग्राम पंचायत स्तरावर अंमलबजावणी करणे तसेच ग्रामीण भागातील समस्या विहीत कालावधीत सोडविणे व कार्यालयीन कामामध्ये पारदर्शिता आणणे
तालुक्याचे नांव : चिखलदरा
जिल्हा – अमरावती
एकुण गांवाची संख्या – 160
एकुण ग्रामपंचायतीची संख्या 54
भौगोलिक क्षेत्रफळ – 250800 हेक्टर
जंगलव्याप्त क्षेत्रफळ 194076.43 हेक्टर
लागवडी खालील क्षेत्रफळ 27948.12 हे
जनगणेने प्रमाणे लोकसंख्या 118815
प्राथमिक आरोग्य केंद्र 05
प्राथमिक उपकेंद्र : 41
ग्रामिण रुग्णालय 02
फिरते आरोग्य पथक : 03
भरारी पथक 10
आयुर्वेदिक दवाखाना : 01
ॲलोपॅथिक दवाखाना 01
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- I :08
पशुदवाखाने श्रेणी-2 03
फिरते पशुवैद्यकीय दवाखाना : 01
जि. प. शाळा एकूण : 103
खाजगी एकूण शाळा : 45
अंगणवाडी केंद्र : 229
माननीय मुख्यमंत्री
माननीय उपमुख्यमंत्री
माननीय पालक मंत्री
माननीय खासदार, अमरावती लोकसभा मतदारसं
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
जिल्हाधिकारी अमरावती
गट विकास अधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा
माननीय उपमुख्यमंत्री
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
माननीय राज्य मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
आमदार मेळघाट विधानसभा मतदारसंघ
विभागीय आयुक्त, अमरावती विभाग
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती
सहा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा
माझी वसुंधरा हा सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या हाती घेण्यात आलेला एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांच्या परिणामांबद्दल जागरूक करण्यासाठी.
जल जीवन मिशन हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जो २०१९ साली सुरू करण्यात आला. मार्च २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
स्वतःचे घर नसलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना. २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.